Aarsa nasta tar essay in Marathi language. आरसा नसता तर मराठी निबंध

Aarsa nasta tar essay in Marathi language आपण दैनंदिन जीवनामध्ये आरशाचा काय उपयोग करता? या प्रश्नाचे उत्तर सहाजिकच सर्वांना माहित आहे. ‘स्वतःला पाहण्यासाठी!’ स्वतःला पाहणे, स्वतःचे रूप आरशात न्याहाळणे, ही तर माणसाची सवयच आहे. आपण सुंदर दिसावे यासाठी माणूस धडपड करीत असतो. आपण घराबाहेर पडताना आरशात पाहून मगच घराबाहेर पडतो हे आहेच पण, पण घरी पाहुणे आले, तर आरशात पाहिल्याशिवाय कोणतीही स्त्री दार उघडायला पुढे जात नाही. इतकेच काय, दार उघडायला उशीर झाला, तरी आरशात पाहण्यासाठी काही क्षण खर्च करणारे पुरुषही मी पहिले आहेत.

कधी कधी मनात येते की, खरेच, आरसा नसता, तर काय झाले असते? छे, छे! कल्पनाच करवत नाही. माझे तर स्पष्ट मत आहे की, आरसा नसता, तर माणूसच निर्माण झाला नसता. माणूस मुळात प्राणीच. प्राण्याचे जीवन जगता जगता त्याच्यात मनुष्यत्वाचे गुण निर्माण झाले आणि तो माणूस बनला. हा जो बदल घडला, तो आरशामुळेच. आरसा हा माणसाच्या माणूसपणाचा अविभाज्य घटक आहे. आपले दर्शन प्रसन्न व्हावे, यासाठी माणूस धडपड करतो. घराबाहेर पडताना माणसे आरशात पाहतात, नीटनेटके होतात, हे तर आहेच; पण घरी पाहुणे आले, तर आरशात पाहिल्याशिवाय कोणतीही स्त्री दार उघडायला पुढे होत नाही.

इतकेच काय, दार उघडायला उशीर झाला, तरी आरशात डोकावण्यासाठी काही क्षण खर्च करणारे पुरुषही मी पाहिले आहेत. आपण प्रसन्न दिसावे, इतरांच्या मनात आपल्याला महत्त्व प्राप्त व्हावे, ही प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा असते. आपल्याला महत्त्व मिळावे, आपले मोठेपण, वेगळेपण प्रस्थापित व्हावे, ही माणसाच्या प्रत्येक कृतीमागे प्रबळ अशी प्रेरणा असते, असा सिद्धांत डॉ. सिग्मंड फ्रॉईड या जगप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञाने मांडला आहेच. मला तर खात्रीच आहे की, प्रत्येक पराक्रमानंतर पराक्रमी व्यक्तीने आरशात डोकावलेले असणारच!

आज तर आरशाने मानवाचे अवघे जीवनच व्यापून टाकले आहे. रस्त्यांवर, दुकानात, कपड्यांवर, गाड्यांमध्ये, जत्रांमध्ये इथे तिथे सर्वत्र आरसा ठाण मांडून बसलेलाच असतो. कोणत्या घरात आरसा नाही असे घर जगाच्या पाठीवर शोधूनही सापडणार नाही. सौंदर्याचे विविध रूपे, विविध आकार लेवून आरसा सर्वत्र मिरवत असतो. सौंदर्यनिर्मिती ही माणसाच्या मुलभूत प्रवृतींपैकी एक आहे. आरशाने माणसाच्या या प्रवृतीला केवढा मोठा वाव दिला आहे! आरसा नसता, तर सौंदर्य निर्मितीच्या महामार्गावरील माणसाची वाटचाल कायम अयशस्वी राहिली असती!

पूर्वी जेव्हा जत्रा भरायच्या त्या जत्रांमध्ये आरसेमहालाचा एक तंबू असायचा. त्या तंबूत नेहमीच गर्दी पाहायला मिळायची. त्या आरसेमहालात विविध प्रकारचे आरसे असायचे. त्या विविध आरशांत आपल्याच विविध प्रतिमा दिसायच्या. गोल गुबगुबीत, भरपूर जाड, काठीसारखी उंच किंवा एकदम बुटकी अशी स्वतःची ती वेडीवाकडी , चित्रविचित्र रूपे पाहून प्रत्येक जन मनसोक्त त्या प्रतिमांचा आनंद घ्यायचा. स्वतःचीच थट्टा करणे, स्वतःचीच गंमत पाहणे!

आरसा नसण्याचे अनेक नुकसान आपल्याला झाले असते परंतु काही लोकांसाठी हे फायद्याचे ठरले असते. जे लोक दिसण्यात कुरूप आहेत किंवा ज्यांचा चेहरा काही कारणास्तव खराब झालेला आहे अश्या लोकांना याचा फायदा झाला असतात. आपला चेहरा कसा दिसतो हे माहीत नसल्याने, इतरांपेक्षा कमी असण्याची भावना त्यांच्यात निर्माण झाली नसती.

परंतु काहीही असो आरसा नसण्याचा फायद्यापेक्षा नुकसानच जास्त आहेत म्हणून आरसा जर नसता तर मनुष्य जीवनही विस्कटलेले राहिले असते. आरसा हा आपल्या जीवनाचा अविभाज्य अंगच आहे.
आरसा नसता, तर माणूस स्वतःकडे इतक्या निखळ आणि निर्मळपणे पाहूच शकला नसता. आरसा नसता, तर सौंदर्यनिर्मितीच्या महामार्गावरील माणसाची वाटचाल कायम अयशस्वी राहिली असती!

आरसा नसता तर…..Aarsa nasta tar essay in Marathi languagen हा निबंध तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा.

Share:

पेटलेली पणती घेऊन, पायाखालची वाट चालत जायची आहे, नवीन वाटांना पायदळी तुडवताना, रचलेल्या शब्दांच्या जोरावर आयुष्याचा वणवा करायचा आहे!!

Leave a Comment