Pruthviche Vadhte Tapman Essay in Marathi Language | पृथ्वीचे वाढते तापमान मराठी निबंध

Pruthviche Vadhte Tapman Essay in Marathi Language पृथ्वीचे वाढते तापमान हे एक समस्या बनून राहिली आहे. मात्र आजच्या परिस्थितीचा विचार केला असता, पृथ्वीवरील प्रत्येक सामान्य माणसाने या जागतिक तापमान वाढीबद्दल जागरूक असणे ही काळाची गरज झाली आहे.  पृथ्वीच्या भोवतालच्या वातावरणाचे तापमान वाढणे म्हणजे ढोबळ मनाने जागतिक तापमान वाढ असे म्हणता येईल. मात्र याला देखील बरेच कंगोरे आहेत. आजच्या हवामानाचा विचार करता पावसाळ्यात चटके लागणारे ऊन, भर उन्हाळ्यात पाऊस तर हिवाळ्यात देखील उन्हाळ्यासारखे ऊन यालाच जागतिक तापमान वाढीचे परिणाम म्हणतात.

पृथ्वीचे तापमान दिवसेंदिवस वाढत आहे याला अजून एक बाब जबाबदार आहे. ‘हरितगृह परिणाम’ अर्थात ‘ग्रीन हाउस इफेक्ट’ हे जागतिक तापमान वाढीत महत्वाची भूमिका बजावत आहे. आता ‘हरितगृह परिणाम’ म्हणजे नेमकं काय? याला आपण एका उदाहरणाने समजून घेऊयात… “एका गाडीच्या सर्व काचा बंद करून तिला भर उन्हात उभे करणे यामुळे गाडीच्या आतील तापमान हळूहळू वाढू लागेल आणि शेवटी तापलेल्या गाडीत माणसाला बसणे अशक्य होईल”. अशाच प्रकारची स्थिती पृथ्वीसोबत मानव सध्या करत आहे.

मात्र आपण ‘सोशल मीडियावर’ या सगळ्या हवामान बदलाची खिल्ली उडवून मोकळे होतो. उन्हाळ्यात पावसाची मजा घेता येते म्हणून या सगळ्या समस्येकडे आपण कळत नकळतपणे दुर्लक्ष करतो. नैसर्गिकरीत्या निर्माण झालेल्या समस्यांसाठी आपण निसर्गाला दोष द्यायला विसरत नाही. मात्र अनेक वेळा यातील काही समस्या या मानवनिर्मित समस्या असतात हे मात्र आपण सोयीस्कररित्या विसरतो आणि याच समस्यांचे परिणाम निसर्ग काही वर्षांनी आपल्याला भोगायला लावत असतो. उदा. जागतिक तापमान वाढीमुळे अंटार्क्टिका येथील बर्फ दिवसेंदिवस वितळत आहे.

1950 पासूनच पृथ्वीचे तापमान वाढत गेले. मात्र आता आपल्याला अनियमित वातावरणातील बदल पाहायला मिळत आहे. ही समस्या मानवी जीवनाचा नाश करणारी समस्या असल्याने आपल्याला याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. वायू प्रदूषण, जल प्रदूषण, हवा प्रदूषण, कचरा प्रदूषण या सगळ्या समस्या यामुळेच व्यक्तीच्या पुढे आल्या आहेत. पृथ्वीचा ओझोन थर विरळ होत असल्याने जागतिक तापमान आणि अंटार्क्टिका प्रदेशावरील बर्फ दिवसेंदिवस वितळत आहे.

जगाची 7.19 बिलियन एवढी मोठी लोकसंख्या सर्व नैसर्गिक संसाधनांना संपवीत आहे. माणूस स्वत:च्या स्वार्थासाठी निसर्गाचा जीव घेत आहे. औद्योगिकी करणामुळे कारखाने वाढले आणि यामुळे मानवाच्या गरजा देखील वाढल्या, मात्र या सगळ्यांमधून आपण पृथ्वीला हानी पोहोचवत आहोत हे मानव विसरला आहे. कारखान्यातून मोठ्या प्रमाणात मिथेन, कार्बन आणि हानिकारक वायू यांचे उत्सर्जन होत असते आणि यामुळे पृथ्वीच्या भोवती असणारा ओझोन थर देखील नष्ट होतांना दिसत आहे. सूर्यावरून पृथ्वीवर जी हानिकारक किरण येतात त्यापासून ओझोन थर आपले संरक्षण करीत असतो मात्र कारखाने, वाहन वाढल्याने दिवसेंदिवस हरितगृह वायूंचे उत्सर्जन वाढत असल्याने हा ओझोन थर कमी होत चालला आहे आणि यामुळे पृथ्वीचे तापमान अधिकाधिक उष्ण होत आहे.

जागतिक तापमानवाढीमुळे अनेक पर्यावरण विषयक समस्या निर्माण झाल्या आहेत. यामुळे पृथ्वीवरील दुर्मिळ जीवांचा नाश तर होतंच आहे, यासोबत महासागरांच्या आम्लीकरणासारख्या समस्या देखील गंभीर रूप धारण करत आहेत. आताच्या परिस्थितीचा अभ्यास केला असता असे लक्षात येते की, या शतकात जागतिक सरासरी तापमान दर दशकात 0.3 ते 0.1 सेल्सिअस इतके वाढत असते. तर हेच तापमान 2025 पर्यंत 1 सेल्सिअसने वाढेल. याचाच अर्थ दिवसेंदिवस आपली पृथ्वी अधिक गरम आणि निस्तेज होत जाईल मात्र मानवाने हरितगृह वायूंचे उत्सर्जन नियंत्रणात आणले तर ही तापमान वाढ नक्कीच कमी होण्यास मदत मिळेल.

मानवाला प्रगतीच्या पायऱ्या चढवणारी वाढती औद्योगिक क्रांती एक दिवस मानव जातीलाच संपविणार आहे, याची कल्पना आपल्याला यायला हवी म्हणून आपल्याला पर्यावरणाचे संरक्षण करायचे आहे. त्यासाठी झाडे लावा झाडे जगवा. पाणी आडवा पाणी जिरवा. या मोहिमा आपल्याला राबवायच्या आहेत.

Pruthviche Vadhte tapman essay in Marathi language.पृथ्वीचे वाढते तापमान मराठी निबंध तुम्हाला कसा वाटला, ते आम्हाला कमेंट करून सांगा.

Share:

पेटलेली पणती घेऊन, पायाखालची वाट चालत जायची आहे, नवीन वाटांना पायदळी तुडवताना, रचलेल्या शब्दांच्या जोरावर आयुष्याचा वणवा करायचा आहे!!