Abhayaranyachi avashyakta essay in Marathi language | अभयारण्याची आवश्यकता

Abhayaranyachi avashyakta essay in Marathi language – वन व वन्यप्राणी यांचे संरक्षण, संवर्धन व जतन करण्यासंबंधी सामान्य जनतेमध्ये जागरुकता निर्माण करण्याची आज गरज आहे. वन्यजीव व्यवस्थापनाचा कायम स्थानिक जनतेशी, लोकप्रतिनिधी आणि अशासकीय संस्थांशी संबंध येतो. जंगलात वाघ असणे हे समृध्द जंगलाचे प्रतिक आहे. जंगलात असलेल्या अन्नसाखळीमधील वाघ हा मुख्यघटक आहे. तसेच वाघामुळे जंगलात असलेल्या वनस्पतींचे आणि इतर तृणभक्षी प्राण्यांमध्ये समतोल राखला जातो. त्यामुळे वाघ हा पर्यावरणातील असमतोल राखण्यासाठी जैविक साखळीतील महत्वाचा घटक आहे.

वाघांची संख्या ज्या जंगलात जास्त असते ते जंगल किंवा तेथील भाग हा सर्व दृष्टीने परिपूर्ण असल्याचे मानले जाते. जंगल उत्कृष्ट असेल तर मानवी जीवन सुसह्य होण्यास कारणीभूत ठरते. वनसंपदेमुळे सर्व प्राणीमात्रांसाठी आवश्यक असलेला ऑक्सिजन, मुबलक पाणी, आणि जमिनीची धूप थांबण्यासही मदत होते. अभयारण्य याचा अर्थ पशु प्राण्यांना तेथे वावरायला अभय वाटेल असे  अरण्य किंवा बंद होईल. जन्माला येणाऱ्या प्रत्येक सजीवाला जगण्याचा अधिकार असतो.

निसर्गात पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने ही प्रत्येक प्राण्याला महत्त्व असते. प्राचीन काळातही पर्यावरणाचा समतोल अशी कल्पना होती. कित्येक राजांनी आपल्या राज्यात जंगले,  वने व उपवनी राखीव ठेवली होती. ऋषिमुनींनी आश्रम नही वनात असत. अशा आश्रमात प्राण्यांना अभय असे. तेथे राजांनाही शिकारीची बंदी असे. याचा अर्थच असा की, पूर्वीच्या काळी माणसाला प्राण्याचे महत्त्व समजले होते व त्याचे पालन, रक्षण हे तो आपले कर्तव्य समजत होता.

अभयारण्यात प्राण्याच्या आजूबाजूला जास्तीत जास्त नैसर्गिक वातावरण राखले जाते. त्यांच्या आवडीनुसार आहार दिला जातो त्यांच्यावर औषधोपचार केले जातात. असे असूनसुद्धा कित्येक वेळा अभयारण्यातील पाण्याच्या नैसर्गिक मृत्यूच्या बातम्या ऐकू येतात. अक्षम्य दुर्लक्ष हे असं हे त्याचे कारण असते. हे सारे थांबवण्याच्या वन्यपशू संबंधीचे अज्ञान दूर केले पाहिजे. तसेच लहानपणा- पासून मुलांच्या मनात प्राणिप्रेम निर्माण केले पाहिजे.

प्राण्याच्या संरक्षणाचं पर्यावरणाचा समतोल राखला जाणार, हे विसरता कामा नये ‘जिथे माणसाचे पाय लागतात तिथे वाळवंट होते’  असेच अक्षरशा झाले.  आता भारतात वरचा भाग कमी झाला आहे. एवढेच नव्हे तर काही प्राण्यांच्या जाती नष्ट झाले आहेत. अनेक देशात आता भारतानेही प्राणी संरक्षणाचे कायदे केले आहेत. तसेच अभयारण्य व राष्ट्रीय उद्यान नि राखली आहेत.

महाराष्ट्रात बोरीवली, पनवेल जवळ कर्नाळा, ओरिसात नंदन कानन येथे, गुजरातमधील बडोदा येथे मोठी अभयारण्य आहेत. जागतिक पातळीवर पर्यावरणाचे महत्त्व जाणून वन्य पशु संवर्धनाच्या दृष्टीने  डब्ल्यू डब्ल्यू एफ ही जागतिक वन्य पशु संघटना प्रयत्न करत आहे. भारतातही वन्य प्राणी संरक्षणाचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. वृक्षतोडीवर प्राण्यावर शिकारीवर आता सरकारने बंदी घातली आहे. एवढेच नव्हे, तर पशु संरक्षण व पशुसंवर्धन हे एक स्वतंत्र खाते निर्माण केले आहे.

आजकाल सर्व प्रकारची माध्यमे, पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे त्याबद्धल आपली मते आग्रहाने मांडीत असतात. विविध संघटना, पर्यावरणप्रेमी, पर्यावरणाला अनुकूल आणि हितदायक गोष्टींचा भावनिक आग्रह धरतात. मग तो आग्रह वृक्षसंवर्धनाचा असो, अनावश्यक वृक्षतोडीला पायबंद आणि प्रतिबंध करणारा ‘हट्टाग्रह अन् हक्काग्रह असो, डोंगरपठाराचे रूपांतर बिनशेतीत करण्याचा सत्ताग्रहाला विरोध असो, केरकचर्‍याचे वैज्ञानिकदृष्ट्या आरोग्यवर्धक नियोजन असो, अनिर्बंध पाण्याचा अपव्यय असो, हवा प्रदुषणाची वाढती व्याप्ती असो!

या प्रकारच्या सार्‍याच ‘सामाजिक समस्याच’ निकोप समाज व्यवस्थेला घातक ठरतात, दुषणावह ठरतात, तापदायक ठरतात, असं नाही कां आपल्याला वाटत? हिरवेगार माळरान, हिरवी शाल पांघरलेली आपली मायभूमी, स्वच्छ जलाशये, मग त्या विहिरी असोत, तलाव वा नद्या असोत, पर्यावरणाला बाधक न ठरणारे खोदकाम असो, बांधकाम असो, याचा पुरस्कार ज्यावेळी समाजात होत असतो, त्यावेळी पर्यावरणाचे संतुलन अस्थिर, अस्वस्थ होत असते. याबद्धल कुणाचेही दुमत असू शकत नाही. म्हणून अभयारण्य काळाची गरज आहे. त्यामध्ये केवळ पशुपक्षीच नाहीतर वृक्षांची देखील मोठ्या प्रमाणावर वाढ होते.

Abhayarnyachi avashyakta essay in Marathi language.
‘अभयारण्याची आवश्यकता’ हा निबंध तुम्हाला कसा वाटला, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

Share:

पेटलेली पणती घेऊन, पायाखालची वाट चालत जायची आहे, नवीन वाटांना पायदळी तुडवताना, रचलेल्या शब्दांच्या जोरावर आयुष्याचा वणवा करायचा आहे!!

Leave a Comment