Bharat Chin Sambandh Essay in Marathi language | भारत चीन संबंध निबंध

Bharat Chin Sambandh Essay in Marathi language – भारत आणि चीन या दोन्ही देशात प्राचीन काळापासून सांस्कृतिक आणि आर्थिक संबंध आहेत.  चीनच्या भूमीवर भारतातून बौद्ध धर्माचा प्रसार झाला. प्राचीन काळापासून बौद्ध धर्माचे शिक्षण घेण्यासाठी चीनच्या  लोकांनी भारतातील विद्यापीठे म्हणजे नालंदा विद्यापीठ आणि तक्षशिला विद्यापीठाची निवड केली होती, कारण त्या काळात जगातील ही दोन विद्यापीठे शिक्षणाची महत्त्वाची केंद्रे होती. त्यावेळी युरोपातील लोकांची रानटी स्थिती होती.

1946 मध्ये चीनमध्ये कम्युनिस्ट राजवटीची स्थापना झाली असली तरी दोन्ही देशांमधील मैत्रीपूर्ण संबंध समान राहिले. चीनच्या संघर्षाप्रती भारताने विकसनशील देशाचे धोरण आखले आणि पंचशीलवरही विश्वास व्यक्त केला. 1949 मध्ये नवीन चीनच्या स्थापनेनंतर पुढील वर्षी भारताने चीनशी राजनैतिक संबंध प्रस्थापित केले. अशाप्रकारे भारत हा चीनच्या पीपल्स रिपब्लिकला मान्यता देणारा पहिला गैर-समाजवादी देश ठरला.

जून 1954 मध्ये चीन, भारत आणि म्यानमार यांनी शांततापूर्ण सहअस्तित्वाची पाच तत्त्वे म्हणजे पंचशील सादर केले. भारत व चीन यांच्यातील संघर्षाची अनेक कारणे संभवत असली, तरी सीमाप्रश्न हे त्यांपैकी एक प्रमुख कारण आहे. चीनला मान्य असलेली सीमा व सीमाप्रदेश, भारत स्वीकारीत नाही, हे पाहून चीनने भारताच्या सीमाप्रदेशावर अकस्मात आक्रमण केले. चीनने सुरू केलेले हे अघोषित युद्ध 20 ऑक्टोबर पासून 21 नोव्हेंबर 1962 पर्यंत चालले.

या युद्धात भारतीय सैन्याचा टिकाव लागला नाही. 22 नोव्हेंबरच्या सकाळपासून चीनने एकतर्फी गोळीबार स्थगित केला व युद्ध बंद पडले तथापि या आकस्मित सैनिकी कारवाईनंतरही चीनला स्वतःच्या अपेक्षेप्रमाणे सीमाप्रश्न सोडविण्यात यश मिळाले नाही. भारत-चीन संघर्ष काळात महत्त्वाच्या लढाया अक्साई चीन आणि अरूणाचलाच्या कामेंग व लेहित या जिल्ह्यांत झाल्या. स्वातंत्र्योत्तर काळात भारताला जी संरक्षणात्मक युद्धे लढावी लागली, त्यांच्या तुलनेत हे युद्ध क्षुद्रच म्हणावे लागते तथापि आंतरराष्ट्रीय कायदा, आशियातील सत्तासमतोल, भारताचे परराष्ट्रीय संबंध आणि राजकीय मतप्रणाली यांच्या दृष्टीने हे युद्ध महत्त्वाचे ठरते.

या युद्धात भारताचे 1,383 सैनिक ठार झाले 1,696 हरवले व 3,968 सैनिक युद्धबंदी झाले. चीनच्या सैनिकी हानीची माहिती उपलब्ध नाही. भारताला एकही चिनी सैनिक युद्धबंदीकरता आला नाही. तुरळक वस्तीच्या डोंगरी प्रदेशात युद्ध झाल्याने नागरी प्राणहानी व वित्तहानी नगण्य होती. वायुसेनेचा उपयोग कोणीही केला नाही. मात्र जखमी सैनिकांसाठी हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला. रणगाड्यांचा वापर अगदी किरकोळ प्रमाणात झाला. चालू राहिला, बिनशर्तपणे खुल्या मनाने चीनने कोलंबो प्रस्ताव मान्य करावा व भारत-चीन सीमाप्रश्न आंतरराष्ट्रीय विधिज्ञ न्यायालयाकडे सोपवावा, असे नेहरूंनी सुचविले.

भारत-चीन सीमाप्रश्न हा सार्वभौमत्वाचे अंग असल्याने भारत व चीन यांच्यातील प्रत्यक्ष विचारविनिमयानेच सोडविला पाहिजे लवाद वगैरे चीनला मंजूर नाही भारताला असाच घोळ घालावयाचा असेल, तर चीन या संदर्भात काहीही उत्तर देणार नाही, असे चौ एन-लायने त्यांवर कळविले होते. श्रीमती बंदरनायके व ईजिप्तचे अली साब्री यांच्या प्रयत्‍नाने भारत व चीनमध्ये समझोता होण्याची आशा वाटत असतानाच 27 मे 1964 रोजी नेहरू दिवंगत झाले.

आजतागायतही लडाखमध्ये चिनी चौक्या आहेत व अक्साई चीन हा रस्ता चीन वापरीत आहे. नेफावरील आक्रमण मागे घेण्याच्या बदल्यात लडाखमधील चीनने व्यापलेल्या अक्साई चीन प्रदेशावरील हक्क भारताने सोडून द्यावा, असा चीनचा हेतू होता. समझोता न झाल्याने चीनचा हेतू अप्रत्यक्षपणे सिद्धीस गेला आहे. काराकोरम खिंडीच्या पश्चिमेकडील प्रदेश हा पाकिस्तानचा प्रदेश आहे, असे म्हणून खुंजेराब खिंडीतून इस्लामाबादपर्यंत चीनने काराकोरम महामार्ग तयार केला यामुळे काश्मीरला मोठा धोका उत्पन्न झाला आहे.

जनता पक्षाच्या राजवटीत 1978 मध्ये चीनशी परत बोलणी सुरू करण्यास त्या वेळेचे परराष्ट्रमंत्री वाजपेयी चीनमध्ये गेले असतानाच व्हिएटनाम व चीनमध्ये अघोषित युद्ध सुरू झाल्याने वाजपेयींना परतावे लागले. भारत-चीन संबंधाबाबत 1978 नंतर पुढील घटना घडल्या. 1975 साली भारतात सिक्कीमचे विलीनीकरण झाले. त्याचा चीनने निषेध केला. कदाचित या घटनेबाबत 1978 मधील भारताचे परराष्ट्रमंत्री अटलबिहारी वाजपेयी व चिनी परराष्ट्रमंत्री हुयांग हुआ यांच्या भेटीत चर्चा झाली असती. व्हिएटनामच्या साहाय्याने कांपूचियात नवे सरकार स्थापन झाले. भारताने त्यास मान्यता दिली. कांपूचियात नव्या सरकारला भारता अगोदर रशियाने मान्यता दिली होती. अलिप्ततावादी राष्ट्रांच्या गटात भारताने परत प्रमुख स्थान प्राप्त करून घेतले.

Bharat Chin sambandh essay in Marathi language.
भारत-चीन संबंध विषयी निबंध तुम्हाला कसा वाटला, ते कमेंट करून नक्की सांगा.

Share:

पेटलेली पणती घेऊन, पायाखालची वाट चालत जायची आहे, नवीन वाटांना पायदळी तुडवताना, रचलेल्या शब्दांच्या जोरावर आयुष्याचा वणवा करायचा आहे!!

Leave a Comment