माझा आवडता कवी कुसुमाग्रज मराठी निबंध My Favourite Poet Kusumagraj Essay in Marathi

My Favourite Poet Kusumagraj Essay in Marathi: विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज हे कवी होते; त्याचप्रमाणे नाटककार, ललित निबंधकार, कथाकार व वृत्तपत्रलेखकही होते. पण त्यांच्या या सर्व साहित्यिक कलाकृतीतून लक्षात राहतो तो त्यांच्यातला कवीच! मग ‘नटसम्राट’ नाटकातील बेलवलकर असो, ‘कौन्तेया’तील कर्ण असो वा ‘स्वप्नांचा सौदागर’ या लेखातील चंद्राची जगाशी ओळख करून देणारा ललितलेखक असो; या सर्वांतून कुसुमाग्रजांचा काव्यात्म पिंड कधीच लपून राहत नाही.

माझा आवडता कवी कुसुमाग्रज मराठी निबंध My Favourite Poet Kusumagraj Essay in Marathi

माझा आवडता कवी कुसुमाग्रज मराठी निबंध My Favourite Poet Kusumagraj Essay in Marathi

‘जीवनलहरी’ हा कुसुमाग्रजांचा पहिला लहानसा कवितासंग्रह १९३३ साली प्रसिद्ध झाला. त्यानंतर ‘विशाखा’, ‘किनारा’, ‘मराठी माती’, ‘स्वगत’, ‘हिमरेषा’, ‘वादळवेल’, ‘छंदोमयी’ अशा आपल्या काव्यसंग्रहांतून या कविश्रेष्ठाने रसिकांना काव्यामृताचा आस्वाद सातत्याने दिला आहे.

कुसुमाग्रजांच्या कवितेची विशेष खासियत म्हणजे त्यांची कविता श्रेष्ठ टीकाकारांना जशी आवडली, तशी तिने अगदी सामान्य रसिकांची मनेही जिंकली आहेत. आपल्या या कवितांना कुसुमाग्रज स्वतः ‘समिधा’ म्हणतात –

‘समिधाच सख्या या, त्यात कसा ओलावा
कोठून फुलापरि वा मकरन्द मिळावा
जात्याच रुक्ष या, एकच त्या आकांक्षा
तव आन्तर अग्नी क्षणभर तरी फुलवावा.’

या काव्यपंक्तीतून कुसुमाग्रजांची विनम्रता प्रत्ययाला येते. त्याचप्रमाणे त्यांच्या काव्यरचनेमागील हेतूही स्पष्ट होतो. सामाजिक विषमतेतील संघर्ष या कवीला सतत अस्वस्थ करतो व तो संघर्ष वेगवेगळ्या प्रतीकांतून प्रभावीपणे व्यक्त होतो. कधी तो संघर्ष उद्दाम आगगाडी आणि तिच्याखाली चिरडली जाणारी जमीन यांमधून प्रत्ययाला येतो; तर कधी तो उफाळणारा सागर व त्याला आव्हान देणारा कोलंबस यांमधून प्रतीत होतो.

कुसुमाग्रजांच्या प्रतिभाशक्तीला अजोड अशा तरल कल्पकतेची जोड लाभली आहे. मग ती कधी ‘पृथ्वीचे प्रेमगीत’ गाऊ लागते; तर कधी ‘अहि-नकुलाच्या’ रूपकातून भिन्न प्रवृत्तींचा संघर्ष मांडते. कुसुमाग्रजांची काव्यवृत्ती भव्यतेला गवसणी घालू पाहणारी आहे. लोकमान्यांच्या पुतळ्याच्या सान्निध्यात त्यांचे मन म्हणते, “ते होते जीवित अन् हा जीवितभास.’ कुसुमाग्रजांच्या मनाला दिव्यत्वाचा, उदात्ततेचा, मृत्युंजयाच्या शोधाचा ध्यास लागलेला होता.

असा हा ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ विजेता माझा आवडता कवी १० मार्च, १९९९ रोजी अनंतात विलीन झाला. त्यांच्या काव्याचा दीपस्तंभ भविष्यातील हजारो मराठी कवींना प्रेरणादायी मार्गदर्शक म्हणून अनंतकाळ प्रकाश पुरवत राहील.

Share:

पेटलेली पणती घेऊन, पायाखालची वाट चालत जायची आहे, नवीन वाटांना पायदळी तुडवताना, रचलेल्या शब्दांच्या जोरावर आयुष्याचा वणवा करायचा आहे!!

Leave a Comment