Essay on Museum in Marathi: संग्रहालयात एक किंवा दोन तास घालवणे खूप माहितीपूर्ण आणि मनोरंजक असते. गेल्या वर्षी आम्ही चार मित्र मुंबईला गेलो होतो. परतीचा दिवस जवळ आला, तेव्हा आम्हाला आठवलं की आम्ही वस्तुसंग्रहालय पाहायला विसरलोच. बस मग काय? आमच्या कडे थोडा वेळ होता म्हणून आम्ही लगेचच मुंबईतील प्रसिद्ध वस्तुसंग्रहालय पाहायला निघालो.
मी पाहिलेले संग्रहालय मराठी निबंध Essay on Museum in Marathi
वस्तुसंग्रहालयाचे वर्णन
संग्रहालयात बरेच वेगवेगळे विभाग आणि वर्ग होते. त्यामध्ये विविध प्रकारच्या वस्तू सजविलेल्या होत्या. सर्व वस्तूंवर चिट्स चिकटविलेल्या होत्या. त्या चिट्स मध्ये वस्तूंबद्दल महत्वाची माहिती थोडक्यात दिलेली होती. शिल्पकला विभागात विविध दगडांनी कोरलेल्या देवतांच्या असंख्य मूर्ती होत्या. तेथे शेषशायी विष्णू आणि ध्यानमग्न भगवान बुद्ध यांच्या अनेक मुर्त्या होत्या. तांडवनृत्य करत असेलेली शंकरांची मूर्ती या विभागाच्या सौंदर्यात भर घालत होती. भांड्यांच्या विभागात विविध धातूंनी बनविलेली भांडी होती, जे ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत मौल्यवान होते.
शस्त्र विभाग
शस्त्रे विभागात अनेक प्रकारची शस्त्रे पाहून आम्हाला आश्चर्य वाटले. प्राचीन काळातील शस्त्रे, तलवारी, तोफ, चिलखत, शिरस्त्राण इत्यादी तेथे ठेवलेल्या होत्या. तेथे आधुनिक शस्त्रेही होती. हे पाहून हृदयात खळबळ उडाली आणि भारताच्या शूर वीरांची आठवण झाली.
प्राणी व पक्षी विभाग व इतर पाहण्यायोग्य वस्तू
प्राणी आणि पक्षी विभागात सिंह, बिबट्या, लांडगे यासारख्या भयानक प्राण्यांचे मृतदेह जिवंत असल्यासारखे भासत होते. पक्ष्यांचे मृतदेह चांगल्या प्रकारे ठेवले होते. लहान चिमण्यांपासून ते मोठ्या गरुडांपर्यंत पक्ष्यांचे मृतदेह जणू जीवंत असल्यासारखे दिसत होते. ग्रामसुधार, पंचवार्षिक योजना इ. चे नकाशे स्वतंत्र भारताची प्रगती दर्शवित होते.
जुन्या कपड्यांचा विभाग खूपच सुंदर होता. त्या कपड्यांमध्ये भारतीय वेशभूषा अतिशय सुंदरतेने प्रतिबिंबित होत होती. नाणे विभागाकडे भारतीय व विदेशी नाणी होती. कुठे आजकालच्या नोटा आणि पैसे आणि कुठे जुन्या काळातील शुद्ध सोन्या चांदीची नाणी! त्या विभागांव्यतिरिक्त चित्र विभाग आणि इतर विभागदेखील अतिशय सुंदर होते. चित्रकला विभागात, वेगवेगळ्या शैलींचे चित्र चित्रांच्या विकासावर प्रकाश टाकत होते.
पाहता पाहता एक तास निघून गेला. खरंच, संग्रहालयातील आमच्या या भेटीने आमचे ज्ञान वाढवले आणि आम्हाला खूप आनंदही दिला.