पिंजऱ्यातील वाघाचे मनोगत मराठी निबंध Autobiography of Tiger in Zoo Essay in Marathi

Autobiography of Tiger in Zoo Essay in Marathi: काही दिवसांपूर्वीच आम्ही सर्कस पाहायला गेलो होतो. सर्कशीतील विविध कलाप्रकार पाहून आम्ही थक्क झालो. जेव्हा वाघांचे कार्यक्रम सुरू झाले, तेव्हा सारे प्रेक्षक श्वास रोखून ते पाहत होते. वाघांचे पिंजरे रिंगणात येऊन उघडले गेले. पिवळ्या सोनेरी ठिपक्यांचे व काळ्या पट्ट्यांचे वाघ मोठ्या डौलात निरनिराळे खेळ करत होते. सर्कशीचा खेळ संपल्यावर मी वाघांच्या पिंजऱ्याजवळ गेलो. तेथला एक वाघ गर्जना करू लागला. आश्चर्य म्हणजे, मला त्याची भाषा समजू लागली. तो गर्जत म्हणाला-“मित्रा, थांब. माझी व्यथा मी आज तुझ्यासमोर मांडत आहे.

पिंजऱ्यातील वाघाचे मनोगत मराठी निबंध Autobiography of Tiger in Zoo Essay in Marathi

पिंजऱ्यातील वाघाचे मनोगत मराठी निबंध Autobiography of Tiger in Zoo Essay in Marathi

तुम्ही मला राष्ट्रीय प्राणी म्हणून संबोधता, तेव्हा बरे वाटते. पण माझा जन्म झाला तो या सर्कसच्या तंबूतच! माझे आई-बाबाही येथेच सर्कसमध्ये होते. आयुष्यभर त्यांनी सर्कसमध्ये तीच तीच कामे केली, त्यासाठी अनेक धोकेही पत्करले आणि चाबकाचे फटकारेही खाल्ले. माझे लहानपण मात्र मोठ्या कौतुकात गेले होते. सर्कसचे मालक आणि त्यांचा मुलगा दोघेही माझे खूप लाड करत. खूप खायला-प्यायला घालत व झोपायला मऊ मऊ अंथरूण देत. त्यावेळी मला त्यांनी कधी चाबकाची भीती दाखवली नव्हती. त्यावेळी मी मोठ्या मजेत होतो. पण-

बालपण सरले आणि त्याचबरोबर माझा हा आनंद हरपला. मी मोठा झाल्यावर माझे खडतर जीवन सुरू झाले. सर्कसमध्ये काम करण्याचा मला कंटाळा येऊ लागला. अंगावर चाबकाचे फटकारे सपासप बसू लागले. स्वच्छंदपणे धावावे, हिंडावे असे सारखे वाटत असे; पण भोवताली होता अजस्र पिंजरा, त्याला होते भलेभक्कम कुलूप! मला माझ्या पारतंत्र्याची जाणीव तीव्रतेने होऊ लागली होती, गुलामी मनाला वेदना देत होती. झाडावर स्वच्छंदपणे विहार करणाऱ्या कावळा-चिमणीचाही मला हेवा वाटू लागला. जेव्हा लहान मुले सर्कशीचा शिकारखाना पाहायला येतात, तेव्हा तर मी मोठ्या निराशेने त्यांच्याकडे पाठ फिरवून बसतो.

“या सर्कशीच्या मालकाबरोबर मी गावोगाव व देशोदेशी हिंडलो आहे. सारे जग पाहिले आहे. मला येथे भरपूर खायला मिळते, तरीही मी येथे दुःखी आहे. आयुष्यभर आम्ही इतरांचे मनोरंजन करतो, या सर्कसवाल्यांसाठी राबतो, मग आमच्या भवितव्याचे काय? मुक्तपणे बागडण्याचे भाग्य आम्हांला कधी लाभेल का? मित्रा, पुन्हा केव्हा भेटू सांगता येणार नाही. आम्ही आता दूर देशी जाणार आहोत… वाघ असूनही गुलामीचे दर्शन घडवण्यासाठी !” इतके बोलून वाघाने पाठ फिरवली. त्याच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले होते. ते पाहून मला खूपच वाईट वाटले.

Share:

पेटलेली पणती घेऊन, पायाखालची वाट चालत जायची आहे, नवीन वाटांना पायदळी तुडवताना, रचलेल्या शब्दांच्या जोरावर आयुष्याचा वणवा करायचा आहे!!

Leave a Comment