स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर मराठी निबंध Swatantryaveer Savarkar Essay in Marathi

Swatantryaveer Savarkar Essay in Marathi: “तुजसाठी मरण ते जनन । तुजवीण जनन ते मरण ।।” असे स्वतंत्रतादेवीला सांगणारा तिचा सुपुत्र हाच खरा स्वातंत्र्यवीर – विनायक दामोदर सावरकर. सावरकरांनी आपल्या ‘माझे मृत्युपत्र’ या कवितेत भारतमातेला सांगितलंय की, आम्ही तिघे भाऊ तुझ्या स्वातंत्र्यासाठी झगडत आहोत. पण आम्ही सात भाऊ असतो तरी आम्ही सातहीजण तुझ्यासाठी बळी गेलो असतो. स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेणे हे ‘सतीचे वाण’ आहे, याची त्यांना पूर्ण कल्पना होती. पण अगदी विदयार्थिदशेपासूनच हा त्यांच्या मनाचा निग्रह होता.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर मराठी निबंध Swatantryaveer Savarkar Essay in Marathi

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर मराठी निबंध Swatantryaveer Savarkar Essay in Marathi

इ. स. १८८३ मध्ये नाशिकजवळील भगूर इथे त्यांचा जन्म झाला होता. इटलीचा राष्ट्रपुरुष जोसेफ मॅझिनी हा त्यांचा स्फूर्तिदाता होता. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी स्वीकारलेला मार्ग सावरकरांना खूप आवडला. पुण्याला महाविदयालयीन शिक्षण घेत असतानाच सावरकरांनी विदेशी कपड्याची होळी केली होती. बी. ए. झाल्यानंतर सावरकर बॅरिस्टर होण्यासाठी लंडनला गेले. तेथे समविचारी तरुणांची एक क्रांतिकारक गुप्त संघटना ‘अभिनव भारत’ सावरकरांनी निर्माण केली. एवढंच नव्हे, तर बॉम्ब तयार करण्याची पद्धतही मराठीत भाषांतर करून त्यांनी भारतात पाठवली.

सावरकरांच्या या कृत्यांचा ब्रिटिशांनी धसका घेतला. याच काळात मदनलाल धिंग्रा या क्रांतिकारक तरुणाने कर्झन वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याची गोळ्या झाडून हत्या केली. प्रकरणी ब्रिटिश सरकारने सावरकरांना लंडन येथे अटक केली. त्यांना भारतात आणले जात असता सावरकरांनी मार्सेलिस येथे समुद्रात उडी टाकून फ्रान्सचा किनारा गाठला. १९१० मध्ये त्यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली व अंदमानच्या काळ्या कोठडीत रवाना केले गेले.

सावरकरांनी काळ्या पाण्याच्या शिक्षेत अतोनात हाल सहन केले. पण त्यांच्या मनातील देशभक्ती तसूभरही कमी झाली नाही. त्यांची ‘माझी जन्मठेप’ व ‘काळे पाणी’ ही पुस्तके त्यांनी देशप्रेमाखातर किती साहिले याची साक्ष देतात. सावरकरांना उत्तुंग कल्पनाशक्ती आणि अफाट प्रतिभेचे वरदान लाभलेले होते. मातृभूमीच्या स्वातंत्र्याची आस त्यांच्या काव्यातून, लेखनातून आणि भाषणातून व्यक्त होत असे. ‘जयोस्तुते’ ‘सागरा प्राण तळमळला’ यांसारखी अनेक प्रेरणादायी काव्ये, ‘विनायक’ वृत्ताची निर्मिती करणारे ‘कमला’ हे महाकाव्य, ‘शतजन्म शोधताना ‘सारखे भावकाव्य त्यांनी रचले. त्यांचे लेख, त्यांची नाटके त्यांच्या जाज्वल्य देशभक्तीचे दर्शन घडवतात. बडोदा इथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. मराठी भाषाशुद्धीसाठीही स्वातंत्र्यवीरांनी खूप प्रयत्न केले व मराठी भाषेत अनेक नवीन शब्दांची भर घातली.

आपल्या उर्वरित आयुष्यात सावरकरांनी ‘हिंदू महासभे’चे व अस्पृश्यता निवारणाचे काम केले. १९६६ साली स्वातंत्र्यवीरांनी या स्वतंत्र भारतात आपल्या देहाचा त्याग केला. स्वातंत्र्यवीर सावरकर हे त्यांच्या देशप्रेमातून व साहित्यातून अमर झाले आहेत.

Share:

पेटलेली पणती घेऊन, पायाखालची वाट चालत जायची आहे, नवीन वाटांना पायदळी तुडवताना, रचलेल्या शब्दांच्या जोरावर आयुष्याचा वणवा करायचा आहे!!

Leave a Comment