Motivation by Sonu Sharma | सोनू शर्मा – मोटिवेशनल स्पीकर

Sonu Sharma – Motivational Speaker

Sonu Sharma – Motivational Speaker: प्रेरणादायी वक्ते म्हणून सोनू शर्मा हे देशभर व्याख्याने देत असतात. अशाच पुस्तकांचे लेखक आणि विचारवंत म्हणून त्यांची या क्षेत्रात ख्याती आहे. कॉर्पोरेट ट्रेनर ही त्यांची आणखी एक ओळख. वेगवेगळ्या कॉर्पोरेट कंपन्यांमधील कर्मचारी – अधिकाऱ्यांसाठी त्यांच्या प्रेरणादायी व्याख्यानांचं आयोजन अनेक ठिकाणी केलं जातं.

‘मला सगळं माहिती आहे”

किंवा “मला सगळं जमतं’,

किंवा”मला सगळं येतं”,

अशा काही वाक्यांची, विचारांची, मनःस्थितीची जी झोळी आपण आपल्या खांद्यावर घेऊन फिरतो, त्यामुळे आपल्याला काही नवीन सुचतही नाही आणि मिळतही नाही. आपल्याला जर खरंच काहीतरी नवीन शिकायची इच्छा असेल तर पहिल्यांदा हे ‘मला सगळं कळतं..”, हे वाक्‍य बाजूला ठेवलं पाहिजे. या वाक्याची ही झोळी आधी खांद्यावरून उतरवली पाहिजे. त्याऐवजी,

– “मला काहीही माहिती नाही..’,

किंवा ‘मला काहीतरी जाणून घ्यायची इच्छा आहे..’,

ही झोळी खांद्यावर घ्यावी, जेणेकरून त्या झोळीमध्ये काहीतरी नवीन विचार, नवी मांडणी घालता येईल; कारण त्याशिवाय बदलांना सुरुवातच होणार नाही.

नोकरी किंवा व्यवसायासाठी आपण काम करतच असतो; पण त्याचसोबत आपण स्वतःवरही काम केलं पाहिजे, स्वतःसाठी काम केलं पाहिजे. हे काम मात्र, काहीसं वेगळ्या स्वरूपाचं आहे. त्यात वाचन, लेखन, मनन-चिंतन अशा गोष्टींचा समावेश होतो. सतत शिकत राहणे, ही तर त्यापैकी सगळ्यात महतत्त्वाची गोष्ट.

इंटरनेट हे माध्यम आता जवळपास सगळ्यांकडे आहे. त्यावर अशा हजारो यशोगाथा मिळतील. यशस्वी कसं व्हावं, लखपती, कोट्यधीश कसं व्हावं वगैरे वगैरे गोष्टी त्यात असतात. त्यांचं वाचन आणि त्यावर चिंतनही केलं पाहिजे. मुख्य म्हणजे, या सगळ्या यशोगाथा आपल्याला मोफत वाचायला मिळतात, ‘पण आपण त्या वाचतच नाही.

पण, आपण इतके व्यग्र असतो की, ते वाचण्याचेही कष्ट आपण घेत नाही. अशा प्रसंगात, आपल्याला एक डायलॉग सतत आठवत असतो तो म्हणजे, मला सगळं कळतं.. माझ्या व्यावसायिक मित्रांना मला हे यानिमित्तानं आवर्जून सांगावंसं वाटतं की, त्यांच्या ज्या कुठल्या व्यवसायात ते आठवडाभराची विक्री करतात ती विक्री म्हणजे, जणू समुद्रातल्या वाळूच्या एखाद्या कणाएवढीच असते. जर जगाच्या दृष्टीनं आपल्या वस्तूची विक्रीदेखील एवढीच असते, तर आपल्याला सगळं कसं येत असेल..?

जर आपल्याला असं मनापासून वाटत असेल की, काही गोष्टी आपल्यासाठी बदलल्या जाव्यात, आपल्या आयुष्यात, आपल्या बँक बॅलन्समध्ये काही चांगले बदल व्हावेत, लोकांनी आपल्याबद्दलचं मत बदलावं, चांगलं बोलावं वगैरे वगैरे. अशी जर आपली इच्छा असेल तर एक गोष्ट आवर्जून केली पाहिजे ती म्हणजे, “मला सगळं येतं..’ या मानसिकतेमधून दूर झालं पाहिजे. आपण स्वतःमध्ये बदल केला पाहिजे. यातील “बदल हा शब्द खूपच महत्त्वाचा आहे आणि त्याची सुरुवात नेहमीच स्वतःपासूनच करायची असते, हेही विसरू नयेच.

Share on:

पेटलेली पणती घेऊन, पायाखालची वाट चालत जायची आहे, नवीन वाटांना पायदळी तुडवताना, रचलेल्या शब्दांच्या जोरावर आयुष्याचा वणवा करायचा आहे!! #श्री_सखी #नागेश भास्करराव #प्राची अशोकराव

Leave a Comment