Motivation by Santosh Nair | संतोष नायर – मोटिवेशनल स्पीकर

Santosh Nair – Motivational Speaker

Santosh Nair – Motivational Speaker: देशातल्या मान्यवर प्रेरणादायी वक्त्यांमध्ये संतोष नायर यांचं नाव घेतलं जातं. मुंबईतल्या अत्यंत सामान्य कुटुंबात जन्माला येऊनही ही व्यक्‍ती आज हजारोंची प्रेरणास्थान बनली आहे. पंधरा वर्षांपासून ते स्मार्ट नावाने कॉर्पोरेट ट्रेनिंग स चालवतात. सेल्स विषयातले जाणकार म्हणून त्यांचा लौकिक आहे.

ज्यांनी यश मिळवण्यासाठी संघर्ष करण्याचा निर्णय घेतला असेल ते कधीही आराम करत नाहीत. आपण जाणीवपूर्वक काही चांगल्या सवयी स्वतःलाच लावून घेतल्या नाहीत तर नकळत अनेक वाईट सवयी आपल्याला लागतात. हा असा संघर्ष ज्यानं सुरू केला असेल तो नेहमीच एकटा असतो. त्याच्यासोबत कोणी असेलच तर तो असतो फक्त परमेश्वर.

जेव्हा आपण अनुभवापेक्षा अभ्यासावर लक्ष केंद्रित करतो, तेव्हा आपल्याला नवनवे आणि मोठे अनुभव मिळायला सुरुवात होते. लोकांनाही बदलण्याची शक्‍ती आपल्यात नसेल आणि काही नवीन शिकण्याची इच्छाही नसेल, तर आपण फक्त आपल्या अनुभवावरच अवलंबून राहतो; कारण अभ्यास केला नाही तर ती शक्‍ती, ती क्षमता आपल्यात कधी निर्माणच होणार नाही, म्हणूनच मिळालेल्या त्याच त्या अनुभवावर जगण्याची वेळ येते. वास्तविक आपला अनुभव आपल्याला ज़िथंपर्यंत घेऊन येऊ शकतो, तिथंपर्यंत तो घेऊन आलेलाच असतो. मात्र, त्यापुढे प्रगती होत नाही.

कष्ट जसे मानसिक असतात, तसेच ते शारीरिकही असतात. आपण नेहमी दोन्हींसाठीही तयार असायला हवं; कारण मानसिकदृष्ट्या सक्षम असलेले अनेकजण सहजपणे निर्णय घेतात, पण शरीराच्या कुरबुरी वाढल्या की आहे तिथेच थांबण्याची वेळ येते, म्हणून तंदुरुस्तीही हवीच.

एखाद्या व्यक्‍तीच्या मनात काहीतरी करून दाखवण्याची प्रबळ इच्छाशक्ती असते, आक्रोश असतो तेव्हाच तो काहीतरी भव्यदिव्य करून दाखवू शकतो. वास्तविक, गर्दीतले लोक हे गर्दीतलेच एक कुणीतरी बनून राहतात. त्यांची ना ओळख असते. ना त्यांना काही नाव असतं.

ना ते पैसे मिळवतात. ना प्रतिष्ठा मिळवतात ना, प्रसिद्धी, ना आपली क्षमता किती ते ही आजमावतात. नाही संघर्ष करायला तयार होतात. हे लोक ‘छोटेच असतात. छोटेच राहतात. छोट्याच गोष्टींचा विचार करतात. छोट्याच गोष्टी बोलतात. छोट्याच जागी राहतात. बारीकसारीकच गोष्टी करत राहतात.

शिवाय, जर कुणी विचारलं की काही मोठं करायचं आहे का. काही मोठी स्वप्नं आहेत का.. तर निर्लज्ञासारखे हात वरही करतात; पण कृती काहीच करत नाहीत.

Share on:

पेटलेली पणती घेऊन, पायाखालची वाट चालत जायची आहे, नवीन वाटांना पायदळी तुडवताना, रचलेल्या शब्दांच्या जोरावर आयुष्याचा वणवा करायचा आहे!! #श्री_सखी #नागेश भास्करराव #प्राची अशोकराव

Leave a Comment