महात्मा ज्योतिबा फुले मराठी निबंध Essay on Mahatma Phule in Marathi

महात्मा ज्योतिबा फुले मराठी निबंध Essay on Mahatma Phule in Marathi: महाराष्ट्राच्या या पवित्र भूमीवर अनेक थोर व्यक्तींनी आपल्या विचारांनी समाजात अनेक चांगले बदल घडवून आणले त्यापैकीच एक म्हणजे महात्मा जोतिबा फुले! ” विदयेविना मति गेली । मतीविना नीति गेली ।। नीतिविना गति गेली । गतीविना वित्त गेले ।। इतके अनर्थ एका अविदयेने केले” ही जोतिबांची शिकवण.

“महात्मा ज्योतिबा फुले” मराठी निबंध Essay on Mahatma Phule in Marathi
Mahatma Jyotiba Phule Marathi Nibandh

महात्मा ज्योतिबा फुले मराठी निबंध Essay on Mahatma Phule in Marathi

जोतिबांचा जन्म 11 एप्रिल १८२७ साली माळी समाजातील गोहे यांच्या घरात झाला. त्यांचे मूळगाव सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील कटगून हे होते.  त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव तर आईचे नाव चिमणाबाई होते. लहानपणीच त्यांच्यावरून आईचे छत्र हरपले होते. त्यांचे वडिलांनी त्यांना मोठ्या प्रेमाने वाढवले. जोतिबांच्या वडीलांना आपल्या मुलांना खूप शिकवायचे होते. तीव्र सामाजिक विरोध असूनही  त्यांनी जोतिबांना शाळेत घातले. शाळेत असताना जोतिबांना इंग्रजी शिक्षणाचे वेध लागले. इयत्ता दहावीत असताना त्यांना अनेक अडचणी आल्या, या अडचणींवर मात करुन त्यांनी आपले शालांत शिक्षण पूर्ण केले.

  • नक्की वाचा लोकमान्य टिळक वर सुंदर मराठी माहिती

वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी सावित्रीबाईशी लग्न केले. सावित्रीबाई निरक्षर होत्या, तरी त्यांना शिक्षणाचे महत्व मात्र होते. ‘ज्ञान ही एक शक्ती आहे’ अशी श्रद्धा बाळगणाऱ्या जोतिबांना हे ठाऊक होते की जोपर्यंत देशातील प्रत्येक मूल जातीच्या बंधनातून मुक्त होऊ शकत नाही आणि देशातील महिलांना समाजातील प्रत्येक क्षेत्रात समान हक्क मिळणार नाहीत तोपर्यंत देश आणि समाजाची खरी प्रगती होऊ शकत नाही म्हणूनच त्यांनी सावित्रीबाईंना सुशिक्षित केले आणि त्यांच्याकडे विदयार्थिनींच्या अध्यापनाचे काम सोपवले.

त्यांनी त्या काळात भारतीय तरुणांना देश, समाज, संस्कृती सामाजिक दुष्कर्म आणि निरक्षरतेपासून मुक्त करण्याचे आणि निरोगी, सुंदर मजबूत समाज निर्माण करण्याचे आवाहन केले. समाज सेवेपेक्षा मनुष्यासाठी कोणताही धर्म नाही. यापेक्षा चांगली देवाची सेवा नाही, असे जोतिबाचे मत होते. त्या काळी हिंदूंच्या उच्च जातींमध्ये विधवेचा पुनर्विवाह निषिद्ध मानला जात होता. वपन न केलेली विधवा ही अपवित्र स्त्री मानली जात असे . विधवांच्या केशवपनाची ही अमानुष चाल बंद व्हावी , म्हणून जोतीरावांनी चळवळ उभी केली. १८७३ मध्ये फुले यांनी ‘ सत्यशोधक समाजा’ची स्थापना केली. सर्व धर्माचे व जातींचे नागरिक या सत्यशोधक समाजाचे सदस्य व्हावेत,  अशी त्यांनी योजना केली होती. ‘बालहत्या प्रतिबंधक गृहा’ची स्थापना केली.  महात्मा फुले यांनी आजीवन सामाजिक सुधारणेसाठी काम केले.

जोतिबांनी आपल्या अयूच्यात अनेक महत्वाची पुस्तके लिहिली. त्यांनी आपल्या ‘शेतकऱ्याचा असूड’ या ग्रंथात समाजातील श्रमिकांच्या विदारक आर्थिक स्थितीचे उत्कृष्ट चित्र रेखाटले आहे. जोतिबांनी आयुष्यभर केवळ मानवाच्या हिताचा विचार केला जोतीरावांनी आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण समाजासाठी वेचला आणि म्हणूनच लोकांनी त्यांना ‘ महात्मा ‘ असे यथार्थपणे गौरवले

Share:

पेटलेली पणती घेऊन, पायाखालची वाट चालत जायची आहे, नवीन वाटांना पायदळी तुडवताना, रचलेल्या शब्दांच्या जोरावर आयुष्याचा वणवा करायचा आहे!!