Motivation by Dr Ujjwal Patni | डॉ. उज्जवल पाटनी – मोटिवेशनल स्पीकर

Dr Ujjwal Patni – Motivational Speaker

Dr Ujjwal Patni – Motivational Speaker: डॉ. उज्जवल पाटनी हे नाव मोटिव्हेशनल स्पीकर म्हणून देशभर प्रसिद्ध आहेच. कॉर्पोरेट ट्रेनर, लेखक आणि मॅनेजमेंट पेशा ही त्यांची वेगळी ओळख. जागतिक कीर्तीचे सेमिनार्स आणि वर्कशॉप्स ते आयोजित करतात. त्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांची मोठी गर्दीही असते. त्यांनी लिहिलेल्या ७ पुस्तकांचा आत्तापर्यंत १२ भाषांमध्ये अनुवादही करण्यात आला आहे. दहा लाखाहून अधिक पुस्तकांची विक्री झाली आहे.

आपल्याला ज्या क्षेत्रात करिअर करायचं आहे, त्या क्षेत्रातील लोकांशी मैत्री केलीच पाहिजे, त्यांच्या सहवासात राहिलंच पाहिजे, असं मी सांगतो.

हा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी मी एक उदाहरण दिलं होतं, म्हणजे, मला समजा डॉक्टर व्हायचं आहे आणि तुम्हाला इंजिनिअर. तर आपण दोघेही करिअरच्या विषयावर फार काळ बोलू शकणार नाही. कारण, दोघांचे विषय वेगळे, दोघांची स्वप्नं वेगळी आणि दोघांचं उद्दिष्टही वेगळं आहे. पण, आपल्या दोघांनाही जर आय टी प्रोफेशनल व्हायचं असेल तर दिवसभर आपण नवे प्रोग्रॅम, नवं सॉफ्टवेअर, नवं कोडिंग या विषयावर बोलत राहू. स्टीव्ह जॉब्जपासून ते बिल गेट्स आणि झुकेरबर्गपर्यैत गप्पांचे विषय तेच असतील. साहजिकच, तुम्हाला आवडीच्या विषयात यश मिळू शकेल.

एका बाबतीत नक्कीच खात्री देता येऊ शकते ती म्हणजे, ज्याला अपयशी व्हायचं आहे, त्याला तर आपण साथीदार म्हणून निवडत नाही. म्हणजे, आपण असाच सोबती निवडाल,

  • जो आपण ठरवलेल्या टप्यापर्यंत सोबत येणार आहे.
  • त्याच्यासोबत असताना आपल्याला वेळेचं भान राहणार नाही,
  •  तुम्ही दोघेही त्याच विषयावर बोलत राहाल, वाचत राहाल,
  • तुमच्या दोघांच्याही चर्चेचे विषय जर तेच असतील तर तुमचा अभ्यासही होत राहील.

आणि यात काहीच आश्चर्य नाही की, कदाचित त्याच व्यक्तीसोबत मिळून तुम्ही पंधरा वर्षानंतर स्वतःची कंपनीही सरू कराल. असे कितीतरी लोक आहेत जे कॉलेजपासूनच एखाद्या कंपनीचे सहसंस्थापक आहेत. त्यामुळे पहिला मुद्दा लक्षात घ्यायचा तो म्हणजे एकसारखे विषय असलेले किंवा आवड असलेल्या लोकांशी मैत्री केली पाहिजे, ती आपल्याला करिअरसाठी उपयुक्त ठरू शकते.

पहिला मुद्दा लक्षात घ्यायचा तो म्हणजे डेस्टिनेशन कम्पॅनियनेशिप. ही सोबत आपल्याला इकडे तिकडे भटकण्यापासून दूर ठेवेल. दुसरा मुद्दा म्हणजे, दिवसाची सुरुवात ही काही नियोजनासह केली पाहिजे. म्हणजे, प्रत्येक गोष्ट नियोजनाप्रमाणे होतेच अस नाही.  पण, निदान सुरुवात जरी नियोजित कामाप्रमाणं झाली किंवा नियोजन करून काही गोष्टी आधीच पूर्ण केल्या तर उरलेल्या वेळेत हवी ती मजा – मस्ती करायला आपण मोकळे.

कॉलेज किंवा ऑफिसमधून परत आल्यानंतर थोडंसं काहीतरी खाऊन घ्या आणि आधी होमवर्क पूर्ण करा. असाईनमेंट जर आजची आहे, तर ती आजच पूर्ण करून टाका. ती उगाचच उद्या किंवा पखावर ढकलू नका. आपण आज ठखलेलं जे काही उद्दिष्ट असेल ते आधी पूर्ण केलं पाहिजे. त्याला जी काही दहा, पंधरा मिनिटं लागतील ती दिलीच पाहिजेत. प्राधान्य असलेली जी काही कामं आहेत ती आधी संपवून टाकली पाहिजेत. त्याला लागेल तेवढा वेळ दिला पाहिजे. त्यानंतर उरलेल्या वेळेचे स्वतःच मालक व्हा.

Share on:

पेटलेली पणती घेऊन, पायाखालची वाट चालत जायची आहे, नवीन वाटांना पायदळी तुडवताना, रचलेल्या शब्दांच्या जोरावर आयुष्याचा वणवा करायचा आहे!! #श्री_सखी #नागेश भास्करराव #प्राची अशोकराव

Leave a Comment