मायबोलीचे मनोगत मराठी निबंध Autobiography of Mother Tongue Essay in Marathi

Autobiography of Mother Tongue Essay in Marathi: मी आहे तुमची मायबोली ‘मराठी भाषा.’ माझी परंपरा जुनी आहे, प्राचीन आहे. नवव्या शतकापासून माझ्या अस्तित्वाच्या खुणा शिलालेखांवर उमटलेल्या दिसतात. तेराव्या शतकात माझ्या एका सुपुत्राने-ज्ञानदेवाने-माझ्या मदतीने ‘ज्ञानेश्वरी’ हा महान ग्रंथ निर्माण केला आणि माझे जीवन कृतार्थ केले. त्यानंतरची माझी वाटचाल ही अखंडित आणि उज्ज्वल आहे. ज्ञानेश्वरांना माझ्याबाबत केवढा अभिमान होता. ते सांगतात, माझी ही मायबोली कशी? तर अमृतालाही पैजेवर जिंकणारी! साऱ्या मराठी संतकवींनी मला आपल्या भक्तिभावनेने सजवले. ओवी-अभंगांची लयलूट केली आणि माझा देव्हारा आत्मतेजाने उजळून टाकला.

नक्की वाचा – माझी आई मराठी निबंध

मायबोलीचे मनोगत मराठी निबंध Autobiography of Mother Tongue Essay in Marathi

मायबोलीचे मनोगत मराठी निबंध Autobiography of Mother Tongue Essay in Marathi

संस्कृत ही प्राचीन गीर्वाण वाणी माझी माता. संस्कृत भाषेनेच मला शब्दभांडार पुरवले व मला समृद्ध केले. संतकवींनंतर आलेल्या पंडितकवींनी संस्कृत भाषेतील कथाकाव्याच्या आधारे माझा आख्यानकाव्याचा खजिना भरून टाकला. पुढे शूर शाहिरांनी पोवाडे, लावण्या रचून वीर आणि शृंगार रसांची उधळण केली. इंग्रजांचे राज्य भारतात आले आणि माझ्या गुणी पुत्रांनी इंग्रजी भाषेतले वाघिणीचे दूध पिऊन पाश्चात्त्य साहित्यांतील उत्तमोत्तम साहित्य माझ्या मदतीने मराठी बांधवांना उपलब्ध करून दिले.

आज मला राजभाषेचा सन्मान दिला गेला आहे; पण माझे वास्तव स्वरूप लाजिरवाणे आहे; डोक्यावर राजमान्यतेचा सोनेरी मुकुट आणि … अंगावरची वस्त्रे मात्र फाटकी! या पन्नास वर्षांत माझे स्वरूप धेडगुजरी झाले आहे. माझ्या सुविदय सुपुत्रांना माझा उपयोग करताना कमीपणा वाटतो. ते पावलोपावली इंग्रजीचा उपयोग करतात, आपला पत्रव्यवहारही इंग्रजीतून करतात. आपल्या कच्च्या बच्च्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांत घालतात. माझ्या लिखित स्वरूपाच्या शुद्धाशुद्धतेकडे तर ते मुळीच लक्ष देत नाहीत.

“काही दिवसांनी अनेक भाषांच्या भेंडोळ्यात ‘माझे’ म्हणजे ‘मराठी भाषेतील शब्द शोधावे लागतील. पण आता दु:ख करून तरी काय उपयोग? अहो जेथे ‘ममी’ च्या आगमनाने ‘आई’ हरवली आहे, तेथे मायबोलीला कोण पुसणार?”

Share:

पेटलेली पणती घेऊन, पायाखालची वाट चालत जायची आहे, नवीन वाटांना पायदळी तुडवताना, रचलेल्या शब्दांच्या जोरावर आयुष्याचा वणवा करायचा आहे!!

Leave a Comment